Homeराज्यआकोट उपविभागीय अधिकाऱ्यांनी केला महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार...

आकोट उपविभागीय अधिकाऱ्यांनी केला महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार…

महसूल दिनाचे औचित्य साधून आकोट उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे आणि तहसिलदार निलेश मडके यानी आकोट महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार केला आहे. काम करताना कर्मचा-याना प्रोत्साहन मिळावं जेणेकरून जनतेची कामे वेळेत व जलदीने पूर्ण होतील असा या सत्काराचा ऊद्देश असल्याचे घूगे म्हणाले.

दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी तहसील कार्यालय आकोट व उपविभागीय अधिकारी कार्यालय आकोट येथील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, अव्वल कारकून, शिपाई, कोतवाल, संगणक परिचालक यांचा उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे, तहसीलदार निलेश मडके, नायब तहसीलदार रविंद्र यन्नावार व अविनाश पोटदुखे यांच्या हस्ते महसूल दिना निमित्त सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना ई चावडी, ई पिक कापणी, हरघर तिरंगा मोहीम, मतदान ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर महसूल दिन साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घूगे, तहसिलदार मडके, नायब तहसिलदार रविंद्र यन्नावार व अविनाश पोटदुखे यांनी सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना महसूल दिना निमित्त शुभेच्छा देत महसूल प्रशासनात कशा प्रकारे काम करायच त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे राजेश बोडखे मंडळ अधिकारी, प्रस्तावना नीलकंठ नेमाडे मंडळ अधिकारी यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments