Homeराज्यविश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमोल कुंचीकोरवी टोळी तीन जिल्ह्यातून तडीपार...

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमोल कुंचीकोरवी टोळी तीन जिल्ह्यातून तडीपार…

सांगली – ज्योती मोरे

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार अमोल कुंची कोरवी या टोळीला पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगली सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीप्रमुख अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी, अमोल जगन्नाथ सरगर व विनोद रामचंद्र मुळके सर्वजण राहणार वडर गल्ली सांगली.

या टोळी विरुद्ध सन 2016 ते 2021 दरम्यान खून, खुनाचा प्रयत्न, घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत करणे, संघटितपणे गुन्हे करणे, असे शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे विश्रामबाग पोलिसात दाखल आहेत. हे गुन्हेगार हे कायद्याला न जुमानणारे असल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी तडीपारचा प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार सारा अहवाल आणि बाबी विचारात घेऊन सदर टोळीला सांगली सातारा व कोल्हापूरया तिन जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पारित केला आहे. सदर कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे,

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार सिद्धाप्पा रुपनर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ माने ,पोलीस कॉन्स्टेबल संदीप घस्ते आदींनी भाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments