Homeगुन्हेगारीअमरावती | महिला आंघोळ करीत असतांना घेत होता व्हिडिओ...अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल...

अमरावती | महिला आंघोळ करीत असतांना घेत होता व्हिडिओ…अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल…

अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका नगरात एका अल्पवयीन मुलाने बाथरुमच्या खिडकीत मोबाइल ठेवून एका महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार महिलेला लक्षात येताच तीने आरडाओरड केली. दरम्यान या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी एका अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत हा धक्कादायक प्रकार घडला. एक महिला बाथरूममध्ये आंघोळीकरिता गेली. आंघोळ करत असताना तिला बाथरूमच्या खिडकीत कॅमेरा दिसून आल्याने, त्याद्वारे व्हिडिओ केला जात असल्याचा संशय आला. त्यामुळे ती लगबगीने बाहेर पडली. बाथरूमला लागून असलेल्या शौचालयात कोण आहे, हे पाहण्यासाठी ती तिकडे सरसावली असता, शौचालयात एक अल्पवयीन मुलगा दिसून आला. आंघोळ करत असताना तू शूटिंग का केली, अशी विचारणा त्या महिलेने त्याला केली. मात्र त्यावर त्याने उत्तर दिले नाही.

महिलेने सदर घटनेची तक्रार गाडगेनगर पोलिसांत केली असून त्या अल्पवयीन मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments