Homeगुन्हेगारीAmravati । उमेश कोल्हे खून प्रकरणातील दहावा आरोपीला NIA ने केली अटक…

Amravati । उमेश कोल्हे खून प्रकरणातील दहावा आरोपीला NIA ने केली अटक…

Amravati – शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात NIA कडून काल शुक्रवारी (दि.१२) दहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी शहरातील लालखडी परिसरातील रहिवासी आहे.

शेख शकील शेख छोटू (२८, रा. इमामनगर, लालखडी, अमरावती) असे ‘एनआयए’ने आज अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या झाली. या प्रकरणाचा तपास २ जुलै २०२२ पासून ‘एनआयए’ करत आहे.

दरम्यान “एनआयए’कडून आठ दिवसांपूर्वी उमेश कोल्हे यांच्या खून प्रकरणात दोन आरोपींना अटक केली. तसेच शुक्रवारी सुद्धा पोलिसांनी एकाला अटक केल. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या दहा झाली आहे. आज अटक केलेला आरोपी हा उमेश कोल्हे खून प्रकरणातील इतर आरोपींसोबत कटात सहभागी असल्याचे “एनआयए’कडून सांगितले आहे.

दरम्यान NIAने आठ दिवसांपूर्वी शहरातून दोघांना अटक केली होती तसेच काहींची चौकशी केली होती. त्यानंतर आज दहावा आरोपी अटक केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments