Homeराज्यकोगनोळी येथील अरिहंत सौहार्दचा वर्धापन दिन साजरा...

कोगनोळी येथील अरिहंत सौहार्दचा वर्धापन दिन साजरा…

कोगनोळी ; प्रतिनिधी..
कोगनोळी ता.निपाणी येथील बाजारपेठ मधील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचा 8 वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत दि.8 रोजी साजरा करण्यात आला.स्वागत,प्रास्ताविक शाखाधिकारी रावसाहेब पाटील यांनी केले.

प्रारंभी सकाळी रामचंद्र कागले-सर यांच्या हस्ते विधिवत पुजा पाठ करण्यात आले.तर अनिल कलाजे यांनी धार्मिक विधी केला.निपाणी भागचे युवानेते उत्तम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आरती करण्यात आली.

यावेळी ग्रा.पं.सदस्य सचिन खोत,युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी प्रकाश गायकवाड, प्रविण पाटील, किरण चौगुले, सुजित माने, उमेश पाटील, पूनम डांगरे, तात्यासाहेब कागले, महेश पाटील,सचिन परीट, विजय लोखंडे, श्रीपती गोरडे,अमोल पाटील,अवधूत ढोबळे,निलेश मगदूम, युवराज परीट, संतोष पाटील-बद्री यांच्यासह अरिहंत संस्थेतील सर्व स्टाफ,कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments