Homeराज्यरामधाम येथे विधीवत पुजा अर्चनेद्वारे उघडले बाबा बर्फानी मंदिराचे कपाट - नागरिकांची...

रामधाम येथे विधीवत पुजा अर्चनेद्वारे उघडले बाबा बर्फानी मंदिराचे कपाट – नागरिकांची एकच गर्दी…

  • पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचे नागरीकांना दर्शनासाठी आवाहन…
  • महाशिवरात्रीपर्यंत राहाणार दर्शनासाठी खुले…

रामटेक – राजु कापसे

नागपुर – जबलपुर महामार्गावरील मनसर येथे असलेल्या तथा पर्यटक मित्र श्री. चंद्रपाल चौकसे यांच्या कल्पकतेतुन त्यांनी उभारलेल्या प्रख्यात रामधाम येथील बाबा बर्फानी मंदीराचे कपाट आज दि. १ ऑगस्टला प्रथम श्रावण सोमवार च्या दिवशी महाराज मंडळींच्या हस्ते विधिवत पुजा अर्चना करून उघडण्यात आले. यावेळी प्रामुख्याने चंद्रपाल चौकसे, सौ. संध्याताई चंद्रपाल चौकसे, महाराज मंडळी यांचेसह शेकडो नागरीक उपस्थीत होते.

सकाळी १० वाजतापासुनच येथे विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली होती. प्रारंभी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचे हस्ते उपस्थीत ह.भ.प. मारोती मेंघरे महाराज, कैलासपुरी महाराज, संत तुकाराम महाराज, विष्णुगिरी महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर मारोती मेंघरे महाराज यांचे किर्तन झाले व त्यानंतर लगेच दहीकाल्याचा कार्यक्रम झाला.

यानंतर चौकसे दाम्पत्य व महाराज मंडळींसह नागरीक बाबा बर्फानी यांच्या मंदिरात दाखल झाले व येथे महाराज मंडळींनी विधिवत पुजा अर्चना केली व तद्नंतर बाबा बर्फानी यांचे कपाट उघडण्यात आले. यावेळी शेकडो नागरीकांनी तेथे दर्शनाचा लाभ घेतला. यानंतर लगेच महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी उपस्थितांमध्ये श्री चंद्रपाल चौकसे संस्थापक रामधाम तीर्थ, सौ. संध्याताई चौकसे, हुकूमचंद आमधरे, पी टी. रघुवंशी, चेतन देशमुख, वीरूभाऊ गजभिये,

देविदास जामदार, देवाजी ठाकरे, मनोज नौकरकर, प्रमोद बरबटे, बनशीलाल ब्रह्मनोटे, सुनील चौकसे, डूमन चकोले, संदीप यादव, विद्याताई चिखले, साहिस्ता पठाण, सारिखा उईके, शिल्पा पेंदाम, दिपक इंगोले, रुपेश जांभूलवार, आरिफ मालाधारी, नासिर शेख, चंद्रभान शिवरकर, श्याम बिसन, नीलकंठ महाजन, इर्शाद पठाण,दामोदर धोपटे, मोहन कोटेकर, दिवाडू नागपुरे, साधना दरडेमल, स्नेहदीप वाघमारे व हजारो भावीकभक्तगन उपस्तित होते.

तर ते भक्तगण येथे घेतात दर्शन
रामधाम तीर्थ क्षेत्र मनसर येथे देशातील १२ ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र व विदर्भातील अष्टविनायक, माता वैष्णोधाम, अमरनाथ गुफा यांची निर्मिती केली आहे. यावर्षी ११ वे वर्ष पूर्ण होत आहे. रामधाम येथील बाबा बर्फानीची (अमरनाथ) गुफा असून येथे बर्फाचे शिवलिंग आहे. जे भावीक अमरनाथ यात्रा करू शकत नाही, ते येथील बाबा अमरनाथचे रामधाम येथे येऊन दर्शन घेत असतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments