Saturday, April 27, 2024
HomeMarathi News Today#BanAsifAli | पाक क्रिकेटपटू आसिफ अलीने बॅटच उगारली नाही तर फरीदला धक्काही...

#BanAsifAli | पाक क्रिकेटपटू आसिफ अलीने बॅटच उगारली नाही तर फरीदला धक्काही दिला…पहा Video

Share

#BanAsifAli -आशिया कप 2022 मधील सुपर 4 मध्ये बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला आणि नसीम खानने लागोपाठ दोन षटकार मारत पाकिस्तानला एक विकेटने विजय मिळवून दिला. या पराभवामुळे अफगाणिस्तानसह भारतही आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. आशिया कप 2022 चा अंतिम सामना आता 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.

या सामन्यादरम्यान पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीने अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद मलिकवर बॅट उगारली होती, त्यामुळे क्रिकेट विश्व त्याच्यावर थक्क झाले होते. अफगाणिस्तानच्या काही क्रिकेटपटूंनी आसिफ अलीवर आयसीसीने बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

आसिफने फक्त बॅटच उचलली नाही तर फरीदलाही धक्का दिला. क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे, असे म्हटले जाते, पण या दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर ज्या पद्धतीने वागले, ते खूपच लाजिरवाणे होते. आसिफ अलीच्या या वर्तनाचा क्रिकेट विश्वात जोरदार निषेध होत आहे. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार गुलबदिन नायबने ट्विटरवर लिहिले की, ‘आसिफ अलीने मैदानावर असा मूर्खपणा दाखवला, त्याला स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांपासून बंदी घातली पाहिजे. कोणत्याही गोलंदाजाला फलंदाज बाद झाल्याचा आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे, अशा प्रकारे लढणे योग्य नाही.

आसिफ अली आणि नसीम शाहच्या रूपाने पाकिस्तानने 9वी विकेट गमावली. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची गरज होती, तर अफगाणिस्तानला एका विकेटची गरज होती. नसीम शाहने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकत पाकिस्तानला संस्मरणीय विजय मिळवून दिला. यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित अफगाण आणि पाकिस्तानी चाहत्यांमध्ये बाचाबाचीही झाली.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: