Homeराज्यकोगनोळी प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ...

कोगनोळी प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथील भिम नगर म्हणून परिचित असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये नामदार शशिकला जोल्ले आणि चिक्कोडी लोकसभा मत क्षेत्राचे खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या विषेश प्रयत्नातुन शासनाच्या एस सी फंडातून 25 लाख रुपये मंजूर झालेल्या निधीतून काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विधिवत पुजा पाठ करून माजी जि.पं.सदस्य सिद्धु नराटे,हाल शुगर संचालक प्रकाश शिंदे, किरण निकाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील गल्ली,बोळातील रस्त्याची दुरवस्था झाली होती.ही बाब मंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

स्वागत,प्रास्ताविक राजाराम नाईक यांनी केले.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील,पीएलडी बँक संचालक विलास नाईक,ग्रा.पं.सदस्य सुनील माने,कुमार व्हटकर,अमित गायकवाड,अजित पाटील,अंकुश दाभाडे ,रंगराव कागले ,सचिन निकम ,

शकील नाईकवाडे , मोहन ढाले ,विश्वनाथ ढाले, जीवन नाईक ,दीपक जिरगे ,आकाश आवटे, श्रीनिवास ढाले, विशाल शिंत्रे ,प्रणव मेस्त्री, सागर ढोबळे ,राहुल ढाले ,निलेश मोहिते, अजय जिरगे, हेमंत ढाले, नंदकुमार ढाले ,बाळासो नाईक यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments