HomeMarathi News TodayCrime Story | 'तो' प्रेयसीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पत्नीला व्हिडिओ कॉल करायचा…कंटाळून पत्नीने...

Crime Story | ‘तो’ प्रेयसीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पत्नीला व्हिडिओ कॉल करायचा…कंटाळून पत्नीने केले हे कृत्य…

Crime Story – पती पत्नीचे नात हे विस्वासावर टिकते मात्र या नात्यात जेव्हा विस्वासघात होतो तेव्हा सर्वच संपून जाते. हि घटना आहे गाझियाबादच्या मधुबन बापुधाम पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या संजय नगरमध्ये संतप्त पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलीला सोबत घेवून पतीची निर्घृण हत्या केली. मात्र, अवघ्या काही तासांत या खुनाच्या गुन्ह्याची उकल करत पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.

पोलिसांच्या चौकशीत आरोपी पत्नी शालूने सांगितले की तिचा पती अमित वर्मा याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. अमित त्याच्या प्रेयसीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पत्नीला व्हिडिओ कॉल करत असे. मग कंटाळलेल्या पत्नीने त्याल संपविण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या संजय नगर सेक्टर-23 येथील एम-ब्लॉकमध्ये राहणारे 40 वर्षीय ज्वेलर अमित वर्मा यांच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला करण्यात आला. रविवारी पहाटे अमितचा मृतदेह त्याच्या कारमध्ये पडलेला आढळून आला. कारच्या आत आणि घटनास्थळाच्या आजूबाजूला रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

5 Reasons to Watch Brahmastra Part One: an Astraverse Movie…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित वर्मा शनिवारी रात्री सहारनपूरला जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. मधुबन बापुधाम पोलिस स्टेशन हद्दीत, रविवारी पहाटे 4 वाजता फॅन्टम-स्वार पोलिस गस्तीवर निघाले असताना कमला नेहरू नगरमध्ये एक वॅगनआर कार रस्त्यावर उभी केलेली आढळली. तपासणी केली असता कारमध्ये एक युवक मृतावस्थेत आढळून आला, त्याचे नाव अमित वर्मा असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित वर्माचा डोक्यात जड वस्तूने वार करून खून करण्यात आला आहे. कारमध्ये रक्ताचे डागही आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

प्राथमिक तपासात पोलिसांना मृत व्यक्तीचे अन्य कोणत्या तरी महिलेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृताच्या पत्नीची चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात विरोधाभास आढळून आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पतीसोबतचे अनैतिक संबंध असल्याने तिने पतीचा खून केला होता.

घरात पतीची हत्या केल्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून महिलेने बेवारस अवस्थेत सोडले होते, असे सांगितले जात आहे. खुनाचा मागमूस लपविण्यासाठी पत्नी व मुलीने रक्ताने माखलेली गादी रात्री टेरेसवर धुवून वाळवली होती आणि घराच्या पायऱ्याही धुतल्या होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments