Homeराज्यप्राध्यापकांच्या समस्या त्वरित सोडविण्याकरिता "डाटा" च्या वतीने कुलगुरुंना निवेदन...

प्राध्यापकांच्या समस्या त्वरित सोडविण्याकरिता “डाटा” च्या वतीने कुलगुरुंना निवेदन…

अकोला – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमधिल प्राध्यापकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामध्ये पदोन्नती संदर्भात डावलने किंवा पदनिश्चितीत विलंब करणे, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या विविध कोर्सेस पुर्ण करिता महाविद्यालय प्रशासनाकडुन अडवणूक करणे याला आळा बसावा तसेच प्रत्येक महाविद्यालयात एस सी, एस टी अन्याय प्रतिबंध समीती स्थापन करुन सक्रिय रित्या कार्यान्वित करणे,

पदनिश्चिती तसेच स्थाननिश्चिती व ईतर समीतीवर तेच ते प्रतिनिधी न पाठवता ईतरही सर्व पात्र प्राध्यकांना कुलगुरु प्रतीनिधि म्हणून संधि देणे, पदन्नोती किंवा पदनिश्चिती समितीमधे उपस्थित असलेल्या मा. कुलगुरू यांच्या प्रतिनिधीने त्या उमेदवाराची पदोन्नती किंवा पदनिश्चिती मंजूर झाल्याची शिफारस करून ताश्याप्रकारचे अप्रूव्हल निर्गमित करावे याकरिता उमेदवारास स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्याची गरज भासू नये, दैनिक भत्यात वाढ करावी,

तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापक व विनाअनुदानित कर्मचारी वर्गाच्या समस्या त्वरित सोडवाव्यात या व ईतर मागणीचे निवेदन डॉ बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन अर्थात डाटा च्या अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याचे वतीने मा कुलगुरू डॉ दिलिप मालखेडे यांना देण्यात आले यावेळी विभागीय सदस्य डॉ कल्याण साखरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ रविंद्र मुंद्रे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे संचालक तथा सामाजिक शास्त्राचे अधिष्ठाता डॉ संतोष बनसोड,

अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ कमलाकर पायस प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मा. कुलगुरुंनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेउन डाटाच्या मागणीला सकारात्मक प्रतीसाद देउन ज्या समस्या मांडल्या त्या त्वरित निकाली काढण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी मा. कुलगुरू यांनी डाटाच्या शिष्टमंडळाशी विविध मुद्यांवर तब्बल दिड तास सकारात्मक चर्चा करुन तंत्रज्ञान आत्मसात करून गुणवत्ता सुधारण्यासंदर्भात चर्चा करुन आवश्यकते वर भर देण्या संदर्भात उपयुक्त चर्चा केली.

डाटा चे विभागीय सचिव डॉ एम आर ईंगळे यांच्या मार्गदर्शनात यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष डॉ प्रसन्नजीत गवई यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यातुन डॉ संदिप भोवते, प्रा राहुल घुगे, प्रा एस आर दामोदर, डॉ ज्ञानशिल खंडेराव, डॉ कैलास वानखडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ सागर जाधव यांच्या नेतृत्वात यवतमाळमधुन डॉ चंद्रकांत सरदार, डॉ शांतरक्षित गावंडे, डॉ किशोर सुरडकर, अमरावती जिल्ह्यातुन डॉ संजय खडसे, डॉ कुसवेंद्र सोनटक्के, डॉ सुरेश गाडे, डॉ रत्नशिल खोब्रागडे, वाशिम जिल्ह्यातुन डॉ पद्मानंद तायडे, बुलढाणा जिल्ह्यातुन प्रा मिलिंद जाधव ईत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments