Homeगुन्हेगारीदहशतवादी याकूब मेननची थडगे खोदून मृतदेह समुद्रात फेकून द्या संतप्त राष्ट्रभक्तांची मागणी...

दहशतवादी याकूब मेननची थडगे खोदून मृतदेह समुद्रात फेकून द्या संतप्त राष्ट्रभक्तांची मागणी…

सांगली – ज्योती मोरे

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या न्यायालयाने फाशी दिलेल्या क्रूर दहशतवादी याकूब मेमन याच्या थडग्याच संगमरवरी फरशाचे कट्टा बांधुन,एलईडी लाईट लावून,फुल वाहून उदाबतीकरण करणाऱ्या देशद्रोही लोकांच्यावर राष्ट्र राष्ट्रद्रोहाचा खटला करून त्यांना ताबडतोब अटक करा. तसेच दहशतवादी याकूब मेमन याच्या थडग्याचे उदात्तीकरण ताबडतोब जमीनदोस्त करा.

अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवादी ओसामाबिन लादेन याचा मृत्युंदेह अमेरिकेने समुद्रात फेकून दिला. त्याच पद्धतीने याकूब मेमनचा मृतदेह थडग्यातून काढून समुद्रात फेकून द्या.अशी मागणी शिवप्रताप मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली.तसेच मारुती चौकामध्ये जोरदार निदर्शने-भारत माता की जय असा जयघोष करण्यात आला.

यावेळी भाजपा,शिवसेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान, हिंदू एकता आंदोलन, रा.स.संघ आदी हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नितीन शिंदे,अविनाश मोहिते,रवी सावंत,भूषण गुरव,मोहन जामदार,संजय जाधव,प्रकाश चव्हाण,प्रदीप निकम,प्रसाद रिसवडे,प्रकाश निकम, बाळासाहेब मोहिते-पाटील, युवराज जाधव,संतोष शिंदे, मोहन श्रीधर मेस्त्री,अजय काकडे,पंकज कुबडे,आदी सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments