Homeराजकीयघराणे शाहीला न देता सर्वसामान्य घरातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्याने...

घराणे शाहीला न देता सर्वसामान्य घरातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्याने काका पुतण्यांच्या पोटात कळा उठत आहेत – आमदार गोपीचंद पडळकर…

सांगली – ज्योती मोरे

मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने ews चा लाभ देण्याचा ठाकरे – पवार सरकारमधील निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही. हे आपण त्याच वेळेस सांगत होतो. यावरून आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की ,काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाहीये.

त्याचप्रमाणे काका पुतण्याचं हे दुखः आहे की मुळात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी न देता एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली म्हणून यांच्या पोटात कळा उठतायेत आणि म्हणूनच ते आता इकडे तिकडे बोंबा मारत फिरतायत. अशी जोरदार टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच पै पाव्हण्यांचं भलं करायचंय, हीच यांची खरी वृत्ती बाकी सगळ्या आपुलकीच्या भूलथापा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments