Homeसामाजिकआज अभियंता दिनी गोकुळ शिरगाव येथील अभियंत्यांचा लोकमान्य कडून सत्कार...

आज अभियंता दिनी गोकुळ शिरगाव येथील अभियंत्यांचा लोकमान्य कडून सत्कार…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात अभियंता इंजिनियर यांची अत्यंत गरज आहे . ह्या इंजिनीयर लोकांच्यामुळेच आज आपण मोठ्या प्रमाणात देशामध्ये प्रगती करत आहोत .प्रत्येक गोष्टीचे नियोजन हे अभियंता परफेक्ट देतात. त्यामुळेच एखादी वास्तू, मशीन शॉप, ऑटोमोबाईल क्षेत्र ,रस्ते विकास ,महामार्गाची रस्त्यांची मांडणी आज या अभियंत्यांच्या सांगण्यावरूनच केली जाते .त्यामुळेच अभियंताना समाजामध्ये मानाचे स्थान आहे.

या अभियंत्यांचा आज अभियंता दिनी सत्कार करण्याचे नियोजन लोकमान्य को-ऑपरेटिव्ह चे संस्थापक व दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक किरण ठाकूर (मामा) यांच्या संकल्पनेतून आज गोकुळ शिरगाव येथील गोशिमा कार्यालयामध्ये अभियंतांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचे सहाय्यक क्षेत्रिय व्यवस्थापक . आर.डी . पाटील, गोशीमाचे चेअरमन मोहन पंडितराव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

गोकुळ शिरगाव येथील आय एफ एम या ठिकाणी इंजिनियर्स अभियंता यांना सन्मान चिन्ह देताना लोकमान्य चे.अधिकारी

सुरुवातीला गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहती मधिल ifm electronic India Private Limited (आयएफएम एलेक्ट्रोनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) मधील बिपिनचंद्र जिरगे, अमित हातगिणे , हर्षल कुलकर्णी, विनायक सूर्यवंशी, अंकुश शेट्टी, मोहन माने, जीवन देसाई, रोहन हटकर, सुदाम पाटील, सागर ठाकरे, श्रेयश प्रभावलकर, श्रेयश शिंदे आणि ऐश्वर्या महाडिक यांचा लोकमान्य चे सर्टिफिकेट व गुलाब पुष्प देंउन सन्मान करण्यात आला.

तर गोशिमा मध्ये प्रशांत क्षीरसागर, सुरेंद्र मुधाले, रोहित टिपुगडे, शुभम सरदेसाई , योगेश खानविलकर, निखिल पोतणीस ,रणजीत मोरे ,राजवर्धन जगदाळे या अभियंत्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी गोशीमाचे खजिनदार स्वरूप कदम, संचालक श्रीकांत पोतनीस, रणजीत मोरे, राजवर्धन जगदाळे ,गोकुळ शिरगाव शाखेचे शाखाधिकारी रविराज खिरुगडे, मार्केटिंग मॅनेजर अभयसिंह पाटील, वरिष्ठ मार्केटिंग कार्यकारी ऋतुराज दळवी, विपणन सहाय्यक अवधूत जांभिलकर, संग्राम चाबूक आणि कृष्णात मोरे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments