Homeगुन्हेगारीट्रक-दुचाकीमध्ये भिषण अपघात...एकाचा मृत्यु तर एक गंभीर…नागपुर-जबलपुर महामार्गावरील बोथीया पालोरा जवळील घटना

ट्रक-दुचाकीमध्ये भिषण अपघात…एकाचा मृत्यु तर एक गंभीर…नागपुर-जबलपुर महामार्गावरील बोथीया पालोरा जवळील घटना

राजु कापसे
रामटेक

देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तथा नागपुर – जबलपुर महामार्गावरील बोथिया पालोरा जवळ आज दि. ११ ऑगस्टला सकाळच्या सुमारास ट्रक व दुचाकी मध्ये भिषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यु तर दुसरा गंभीर जखमी झालेला आहे.

मृतकाचे नाव अंकीत पैकराम पटले वय २३ वर्ष रा. वरुड ता.कटंगी, जि. बालाघाट असे आहे तर अतुल विनोद पटले वय २१ वर्ष रा. गोपालपुर, ता. कटंगी, जि. बालाघाट असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी घटनास्थळ गाठले व रुग्णवाहीकेला बोलवुन मृतदेह तथा जखमीला हलविले. पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments