Homeगुन्हेगारीगोकुळ शिरगाव पोलिसांकडून चोरीच्या आठ मोटरसायकल जप्त...

गोकुळ शिरगाव पोलिसांकडून चोरीच्या आठ मोटरसायकल जप्त…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

कणेरीवाडी (ता. करवीर) येथे चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी आलेल्या मोटरसायकल चोर भिकाजी पांडुरंग पाटील (वय ४२ शिरसे ता. राधानगरी) यास सापळा रचून जेरबंद केले व त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या आठ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गोकुळ शिरगाव व औद्योगिक वसाहतीतील परिसरामध्ये मोटर सायकल चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्यामुळे सदर चोरीवर प्रतिबंध व गुन्हे उघडकिस आणण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने तपास सुरू असताना खबर्यामार्फत एक इसम चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी कणेरीवाडी गावचे हद्दीतील हॉटेल रविकिरण मागील रोडवर येणार असल्याची खबर पोलिसांनी मिळाली.

प्राप्त माहितीच्या आधारे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने , महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंगटे, संदीप जाधव, पोलीस नाईक सुहास संकपाळ, युवराज कांबळे, आप्पालाल मिस्त्री व पोलीस कॉन्स्टेबल भरत कोरवी यांनी सापळा लावून गाडी विकण्यासाठी आलेल्या संशयित आरोपी भिकाजी पाटील यास पकडले असता त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली एक स्प्लेंडर दुचाकी आढळून आली.

अधिक चौकशी केली असता कनेरीवाडी, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत येथून ७ व जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा आठ मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली घरी लपवलेल्या सात मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या. असून गोकुळ शिरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments