Friday, April 26, 2024
Homeविविधकोगनोळीतील श्री अंबाबाई मंदिरातील जागर सोहळ्या दिवशी जोल्ले दांपत्यानेही घेतले दर्शन...

कोगनोळीतील श्री अंबाबाई मंदिरातील जागर सोहळ्या दिवशी जोल्ले दांपत्यानेही घेतले दर्शन…

Share

कोगनोळी प्रतिनिधी…

चिक्कोडी लोकसभा मत क्षेत्राचे खासदार आण्णासाहेब जोल्ले आणि कर्नाटक राज्याच्या कँबिनेट मंत्री नामदार शशिकला जोल्ले यांनी देखील दि.3 रोजी सकाळी 10:30 च्या दरम्यान श्री अंबाबाई मंदिरातील जागर सोहळ्या दिवशी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.यावेळी जोल्ले दांपत्याने अंबाबाई मंदिराची प्रदक्षिणा घालून मंदिराच्या मागील बाजूस बांधण्यात येत असलेल्या भावनाची पाहणी केली.

प्रारंभी त्यांचे स्वागत ग्रा.पं.सदस्य विद्या व्हटकर व अन्य कार्यकर्त्यांनी केले.नवरात्र उत्सवाच्या काळात देवीची वेगवेगळ्या रूपातील पूजा कशी बांधली जाते याबद्दल पुजारी सुरेश गुरव बाळू गुरव यांनी माहिती दिली. जागर सोहळ्याची बांधण्यात आलेल्या पूजेबद्दल सर्व गुरव बंधूंचे यावेळी जोल्ले दांपत्याच्या वतीने यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य सुनिल माने, स्वाती प्रीतम शिंत्रे , वैशाली सचिन निकम, राजु डोंगळे,कुमार हटकर ,रंगा कागले, विजय भिवाजी पाटील, दिलावर बहिरवाडे, बबलू पाटील अजित पाटील, वैभव पाटील ,अमित गायकवाड, महेश संकेश्वरे, अरुण पाटील ( काका), विठ्ठल कोळेकर ,किशोर व्हटकर, रणजीत व्हटकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: