Homeदेशजयपूर रग्सने ‘रग उत्सव'ची घोषणा, देशभरात १०,०००+ कार्पेट्स सवलतीच्या दरात देण्यात येणार...

जयपूर रग्सने ‘रग उत्सव’ची घोषणा, देशभरात १०,०००+ कार्पेट्स सवलतीच्या दरात देण्यात येणार…

भारतातील सर्वात मोठे हातबनावटीचे रग उत्पादक जयपूर रग्सने आपल्या आजवरच्या सर्वात मोठ्या उत्सव बोनांझाची घोषणा केली. या वर्षी या उत्सवाचे नाव ‘रग उत्सव-नॉट-सो-ऑर्डीनरी’ असून हा उत्सव २४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणार आहे.

जयपूर रग्स नवरात्र आणि दसर्‍यादरम्यान १०००० पेक्षा जास्त रग्स, शेकडो स्टाइल्स आणि हजारो रंगांमध्ये विशेष डील्समध्ये ६०% पर्यंत सूट देणार आहे. यावेळी, आशीष शाह, विनीता चैतन्य, गौरी खान, कवी, तान्या आणि संदीप खोसला, शांतनु गर्ग आणि इतर अनेक जागतिक कीर्तीच्या डिझाइनर्सच्या संग्रहाबरोबरच हाताने विणलेल्या,

हँड टफ्टेड, हँडलूम आणि फ्लॅटवीव्ह सतरंज्यांवर देखील सवलत मिळेल. डिझाइनचे शौकीन जयपूर रग्सची वेबसाइट, दिल्ली, मुंबई, जयपूर आणि बंगळूर स्थित रिटेल स्टोर्स आणि चेन्नई, हैदराबाद व अहमदाबाद येथील स्टोअर-इन-स्टोर्स कडून या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

या सवलतींच्या व्यतिरिक्त, जयपूर रग्स संपूर्ण भारतात मोफत डिलिव्हरी आणि आपल्या उत्पादनांवर दोन वर्षांपर्यंतची वॉरंटी यांसारख्या मूल्यवर्धित सेवा देते. जयपूर रग्स एक नावीन्यपूर्ण डाग-रोधक कोटींग देखील सादर करत आहे. ज्याच्यामुळे, कोणतेही द्रव्य रगवर सांडले तरी रग सुरक्षित राहतो.

ही डाग-रोधक सेवा जुन्या आणि नव्या ग्राहकांसाठी देण्यात येणारी एक अतिरिक्त सेवा आहे. पण कोणत्याही ब्रॅंडच्या रगवर ते वापरता येऊ शकते. हा ब्रॅंड इंटिरियर डिझाइनर्स आणि रग विशेषज्ञाकरवी मोफत व्हर्चुअल सल्ला देखील ऑफर करतो, जेणे करून रग आणि कार्पेट विकत घेताना ग्राहक सर्व महितीचा उपयोग करून योग्य निवड करू शकतो.

जयपूर रग्सचे संचालक श्री. योगेश चौधरी म्हणाले, “आमच्या ग्राहकांना आमच्या प्रसिद्ध डिझाइनर्सच्या दर्जेदार श्रेणीतील सर्वोत्तम कलेक्शनचा पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणे करून या उत्सवी वातावरणात आणखी रंगत येईल. रग उत्सव हा उत्सवाच्या उत्साहाचा पर्याय झालेला आहे, ज्याची लोक उत्साह आणि उत्सुकतेने प्रतीक्षा करतात.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments