Friday, April 26, 2024
Homeगुन्हेगारीकोगनोळी नजीक पुणे बंगळूर महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू…

कोगनोळी नजीक पुणे बंगळूर महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू…

Share

कोगनोळी ; प्रतिनिधी…

कोगनोळी ता.निपाणी येथील हालसिद्धनाथाथ नगर नजीक पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवार दि.26 रोजी कार आणि मालवाहतूक तीनचाकी रिक्षाच्या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जखमी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी सौंदलगा ता.निपाणी येथील मालवाहतूक तीनचाकी रिक्षातून कागलच्या आठवडी बाजाराला माळवे घेऊन जात असताना याच वेळी निपाणीतुन कागलकडे जाणाऱ्या एका चारचाकी कार गाडीने मागुन मालवाहतूक रिक्षाला जोराची धडक दिल्याने सदर मालवाहतूक रिक्षातील आठवडी बाजाराचे साहित्य सर्वत्र पडले असुन यामधील एकाला गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला असुन दिलीप शामराव सांगावे वय 40 असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तर दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असुन त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती मिळाली.

या अपघातामधील कार गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.ही माहिती पोलिसांना मिळताच निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.या अपघातातील जखमीना निपाणी येथील शासकीय गांधी हाँस्पिटल येथे पाठविण्यात आले होते.

अपघातातील उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या सौंदलगा येथील दिलिप सांगावे यांच्या निधनाने सौंदलगा गावात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात आई, पत्नी ,दोन मुले,भाऊ असा परिवार आहे. ते मनमिळावू व कष्टाळू म्हणून सर्वांना परिचित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: