Homeगुन्हेगारीबँकेत आलेल्या नागरिकांकडून हातचलाखीने फसवणूक करून पैसे चोरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास एल.सी.बी.ने केले...

बँकेत आलेल्या नागरिकांकडून हातचलाखीने फसवणूक करून पैसे चोरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास एल.सी.बी.ने केले जेरबंद…दोन गुन्हे उघडकीस…

सांगली – ज्योती मोरे

बँकेत आलेल्या ग्राहकाकडून तेलकट नोटा बदलून घेण्याच्या तसेच पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून पैसे चोरणाऱ्या, कुर्बानीअली सरफराज इराणी वय 38 वर्षे, राहणार ख्वाजा कॉलनी, सह्याद्री नगर सांगली. या सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस यश आले आहे.

सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील युनियन बँक आपटा पोलीस चौकी जवळ तसेच माधवनगरातील युनियन बँकेच्या शाखेतून तेलकट नोटा बदलून घेण्याच्या तसेच पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत ग्राहकांचे पैसे लंपास केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या.

या घटनांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस नाईक सागर लवटे यांना खास बातमीदारा मार्फत सदर गुन्हेगार सूतगिरण ते मिरज रोडवरील चाणक्य चौकात येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 13500 रुपये इतकी रक्कम मिळून आली. सदर पैशाबाबत चौकशी केली असता ते पैसे सांगली आणि माधव नगर मधील बँकातून पैसे मोजून देण्याच्या पाहण्याने चोरलेल्या रकमेतील असल्याचे त्याने सांगितले त्याच्या जवळून रोख रक्कम 13500 आणि गुन्ह्यात वापरलेली 50 हजार रुपये किमतीची हिरो हिरो होंडा हंक गाडी असा एकूण 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी संजय नगर पोलीस ठाण्याकडे तपास कामासाठी वर्ग करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, जितेंद्र जाधव, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, अनिल कोळेकर, संदीप पाटील, संतोष गळवे, सागर टिंगरे, विक्रम खोत, उदय माळी ,प्रकाश पाटील ,कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments