Homeराजकीयमेंढला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर वाडबुदे, उपाध्यक्ष उमेश सेबेंकर...

मेंढला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर वाडबुदे, उपाध्यक्ष उमेश सेबेंकर…

नरखेड – अतुल दंढारे

मेंढला येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या आज 19 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक संपन्न झाली.अध्यक्षपदी मधुकर वाडबुदे व उपाध्यक्ष पदी उमेश सेबेंकर याची निवड अविरोध निवड झाली. संस्थेच्या अविरोध निवडी साठी जिल्हा परीषद सदस्य सलील देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य मनोहर चरपे, राष्टवादी कागेस पाटीचे महाराष्ट चिटणीस बंडु उमरकर, यांनी विशेष प्रयत्न केले.

आजच्या निवडणुकीत मोतीराम दंढारे, निलकंठ खंडारे, सोनाबाई वाडबुदे, जयश्री चरपे, गंगाधरजी दोडके, चंद्रशेखर निकाजू, दयारामजी सातपूते, गुणवंत वाडबूध्दे, तसेच दोन सदस्य रमेश चरपे, भागवत चरपे हे गैरहजर होते निवडणुक अधिकारी यांनी दिलेल्या वेळेवर ते हजर झाल्या नसल्यामुळे निवडणुक ही अविरोध पार पडली, ही निवडणूक ,सचिव मोहनजी राऊत यांच्या उपस्थिती पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एस .आर .अहिर यांनी काम पाहिले. समस्त गावकऱ्यानी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments