Homeराजकीयमनसे चे बॅनर फाडले ! पार्क साईट मध्ये वाद, तणाव वाढण्याची शक्यता...

मनसे चे बॅनर फाडले ! पार्क साईट मध्ये वाद, तणाव वाढण्याची शक्यता…

मुंबई – धीरज घोलप

मनसे घाटकोपर विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या वाढदिवसानिमित्त पार्कसाईट येथील बस स्टँड जवळ लावण्यात आलेल्या मनसेच्या बॅनर अज्ञात लोकांनी फाडले. या अगोदर देखील मनसेच्या मोफत कोकण बस सेवेचे बॅनर पाडले होते.

या बाबत मनसे कार्यकर्ते लवकरच फाडण्यात आलेल्या बॅनर बाबत पार्क साईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.अशी माहिती मनसे उपविभागीय अध्यक्ष विजय परब दिली. पुन्हा हा प्रकार झाल्याने मनसे नेते आणि पदाधिकारी याबाबत काय पाऊल उचलणार हे पाहणे गरजेचे आहे. पार्क साईट येथील ३८७ बस स्टँड जवळ बॅनर फाडले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments