Homeराज्यखासदार धैर्यशील माने यांचा मातंग समाजाकडून सत्कार - प्रशांतभाऊ सदामते...

खासदार धैर्यशील माने यांचा मातंग समाजाकडून सत्कार – प्रशांतभाऊ सदामते…

सांगली – ज्योती मोरे

भारत सरकारने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेमध्ये केली आहे. त्यांच्या या मागणीबद्दल व पाठपुराव्याबद्दल राष्ट्र विकास सेने तर्फे सत्कार करण्यात आला.

राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार करण्यात आला.सा अण्णाभाऊ साठे हे केवळ मातंग समाजाचे नव्हे तर सर्वसामान्य उपेक्षित समाजाच्या व्यथा त्यांनी त्यांच्या लेखणीतून मांडल्या, त्यांनी अनेक कथा कादंबरी वगनाट्य,चित्रपट कथासंग्रह लिहले शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन केले मुंबई महाराष्ट्र राहण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे सा अण्णा भाऊ साठे यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे.

साहित्याच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय तसेच उपेक्षित समाजाला न्याय द्यावा अशी मागणी विविध वक्त्यांनी यावेळी केली.

प्रशांत सदामते म्हणाले आज सर्व राजकीय पक्षाचे नेते मताच्या राजकारणासाठी सा.अण्णाभाऊ साठे यांचे नाव वापरतात,परंतु बहुसंख्य नेते प्रत्यक्षात मात्र त्यांच्या कार्याचा गौरव करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. परंतु खासदार धैर्यशील माने या गोष्टीला अपवाद आहेत.

भारतरत्न पुरस्कार मिळेपर्यंत धैर्यशील माने यांनी या मागणीसाठी पाठपुरावा करावा, देशातील समस्त मातंग समाज त्यांच्या सोबत राहील असे आश्वासन यावेळी सदामते यांनी दिले .यावेळी अमर मगदूम, युवा उद्योजक राजू गायकवाड, युवा नेते आशिष पवार,पंकज सनदी,विवेक कांबळे, नितीन कुंभार आदीजन शिष्टमंडळामध्ये उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments