Homeराज्यमुर्तिजापूर | तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे कावड यात्रे निमित्त आढावा बैठक…कावड मंडळीसाठी असे...

मुर्तिजापूर | तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे कावड यात्रे निमित्त आढावा बैठक…कावड मंडळीसाठी असे आहेत नियम…

कावड मंडळांनी नियमांचे पालन करावे – संतोष राऊत (उपविभागीय पोलिस अधिकारी)

मुर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील तिर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या रविवारी तिर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे येणाऱ्या कावड मंडळच्या प्रमुख पदाधिकारी बैठक बुधवार दि. १७ ला. श्री.लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे आयोजित केली होती.

सदर बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष राऊत साहेब , मुर्तिजापुर ग्रामिण पोलीस स्टेशन चे ठाणेदार पांडव साहेब, दर्यापुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रमेस आत्राम साहेब ,सहाय्यक पोलिस निरीक्षक स्मिता पाटील , यांनी कावड मंडळांना मार्गदर्शन व नियम व येणाऱ्या अडचणी विचारण्यात आल्या . सदर बैठकीत पोलिस विभागाकडुन सुभाष उघडे , प्रसाद विभांडीक ,सुनिल साबळे, गजानन सयाम, सरपंच अजय तायडे, उपसरपच राजप्रसाद कैथवास, ग्रामसेवक जाधव साहेब ,संस्थानचे अध्यक्ष राजू दहापुते, राम जोशी, त्रिलोक महाराज , नजाकत पटेल , दर्यापुर व मुर्तिजापूर येथील कावड मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार अतुल नवघरे, पत्रकार आकाश जामनिक, संतोष माने, सुरज कैथवास, ओम बनभेरू ,राधेश्याम राठी , गोवर्धन जामनिक, सुरेश जामनिक ,डिगांबर नाचणे, राधेश्याम पुरोहीत, बाबाराव तामसे, प्रमोद अवघड ,तुळशिराम वरणकार, राकेश पुरोहीत, नामदेव सुरजुसे, प्रेम कैथवास, डिगांबर उघडे, सचिन तामसे, सनिल गोरे, नितीन तामसे, प्रशांत पंडीत, सुनिल उघडे, अंबादास कुकडे, कैलास तामसे लक्षेश्वर संस्थांचे सेवाधारी सह इ. उपस्थिती होती .संचालन व आभार संस्थानचे अध्यक्ष राजु दहापुते यांनी मानले.

• हे आहेत नियम-
१) वाद्यावर सुप्रीम कोर्टाने डीजे वर बंदी घातलेली असून कोणीही डीजे चा वापर करणार नाही.
२) ध्वनी प्रदूषण होणार नाही याबाबत आवाजावर नियंत्रण ठेवणे . रात्री 10 नंतर कोणती वाद्य वाजणार नाही
३) उल्लंघन झाल्यास ध्वनी प्रदूषण कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
४) ठरवून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्क करतील.
५) कोणीही हुजतबाजी करणार नाही. कायदेशीर कारवाई करू.
६) प्रत्येक मंडळा सोबत स्वयंसेवक नेमावे कमीत कमी २० ,
७) कावड घेऊन जाताना वाहतुकीच्या नियमाचे पालन करून रोडवर अडथळा होणार नाही याबाबत मंडळाने दक्षता घ्यावी.
८) मुख्य रस्त्यावर कोणी विनाकारण थांबणार नाही .
९) आपल्यामुळे इतर भाविकांना व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी .
१०) काही अनुसूचित प्रकार दिसून आल्यास तात्काळ ड्युटीवरील पोलिसांना त्यांची माहिती देतील.
११) मंदिर परिसरात तसेच नदीच्या परिसरात कोणी विनाकारण गर्दी करणार नाही. तसेच नदीवर कोणतीही घटना दुर्घटना घडू नये या दृष्टीने खबरदारी घेतील.
१२) कावळ मंडळांनी शक्यतो लहान मुलांना सोबत आणू नये तसेच नदीपत्राकडे येऊ देऊ नये.
१३) कोणीही नदीच्या खोल पाण्यात उतरू नये .
१४ ) कोणीही मद्यपान किंवा मध्यविक्री करू नये .कारवाई करण्यात येईल .
१५ ) कोणीही आक्षेपार्ह बॅनर पोस्टर लावणार नाही.
१६ ) आक्षेपार्ह गाण्याची कॅसेट वाजणार नाही.
१७ ) मिरवणुकीच्या दरम्यान कुणीही झेंडे पताका लावणार नाही. मिरवणूक संपल्यावर तात्काळ काढून घेतील.
१८ ) मंदिर परिसरात स्वच्छता ठेवतील व सहकार्य करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments