Saturday, April 27, 2024
Homeकृषीनरखेड । मक्याच्या बियाण्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक...नुकसान भरपाईची मागणी...

नरखेड । मक्याच्या बियाण्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक…नुकसान भरपाईची मागणी…

Share

नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील घटणा

अतुल दंढारे नरखेड –15

नरखेड – मक्याच्या बियाण्यामध्ये फसवणूक झाल्याबाबत व नुकसान भरपाई मिळणे बाबत भैय्याजी वामनराव बेलखेडे राहणार सावरगाव यांनी माननीय तालुका कृषी अधिकारी नरखेड यांना नुकतेच निवेदन दिले आहे. त्यांनी आपली कंपनीद्वारा फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे.

सावरगाव येथील शेतकरी बेलखेडे यांनी आपल्या शेतामध्ये मक्याची पेरणी केली होती परंतु मक्याचे बि निकृष्ट दर्जाचे असल्याने असल्याने मक्याचे रोप निघाले नाही. राज कृषी सेवा केंद्र सावरगाव यांच्याकडून त्यांनी मक्याच्या तीन बॅग व एक बॅग सिजेंटा एन के 6240 प्लस हायब्रिड कॉर्न सीड या मका बियाण्याचे खरेदी केले होते.

मात्र हे मका बियाणे शेतीत पेरल्यानंतर या बियाण्याची उगवण क्षमता कमी असल्याने व मक्याच्या पिकाला मक्याच्या कणसाचे उत्पादन फार कमी प्रमाणात झाल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

शेतकऱ्याची परिस्थिती या अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटामुळे फार बिकट झालेली आहे त्यात अशी कंपनीकडून लुटमार जर होत असेल तर शेतकरी कसा जगेल हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांजवळील मक्का कंपनीत तीस रुपये किलोने विकत घेते व त्यावर लेबलिंग व पॅकिंग करून तीनशे रुपये किलो विकते त्यातही श्री भैय्याजी बेलखेडे सावरगाव यांच्या शेतातील मक्याला एकही कनीस आले नाही त्यामुळे आधीच हालाकीचे जीवन जगत असणाऱ्या शेतकऱ्या वर हा अन्याय आहे. भैय्याजी बेलखेडे यांनी चार एकरात मक्का पेरलेला होता.उत्पन चांगले होणार या आशेने मक्का लवणात आला.परंतु शेतकऱ्या नशिबी मात्र नापिकी आली.हि कंपनीने केलेली शेतकऱ्याची फसणूक असून सरकारने अशा कंपनी वर कार्यवाही करावी.अशी मागणी होत आहे.

त्यामुळे सिजेंटा कंपनीने श्री बेलखडे यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी. तसेच सरकारी यंत्रणेने त्यांना मदत मिळण्यास सहकार्य करावे. अशी मागणी वैभव दळवी माजी उपसभापती तथा तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केली आहे


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: