Homeग्रामीणनरखेड | विद्यार्थांनी सांगितले हिरव्या भाजीपाल्यांचे महत्त्व...नर्सरी ते केजी 2 च्या विद्यार्थ्यांनी...

नरखेड | विद्यार्थांनी सांगितले हिरव्या भाजीपाल्यांचे महत्त्व…नर्सरी ते केजी 2 च्या विद्यार्थ्यांनी केला ग्रीन डे साजरा…

विद्यार्थ्यांनी साकारली वृक्ष, हिरव्या फळभाज्यांची वेशभूषा….विद्यार्थ्यांनी केला हिरवा पोशाख परिधान….सर्वत्र हिरवळ.

अतुल दंढारे नरखेड -24

नरखेड तालुक्यातील जलालखेडा एस.आर.के इंडो किड्स येथे नर्सरी ते केजी 2 च्या विद्यार्थ्यांनी ग्रीन डे साजरा केला असून. शनिवारला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केजी 2 च्या विद्यार्थ्यांनी वृक्षाची रूपरेषा साकारली असून मानवी जीवनात वृक्षानचे महत्व काय आहे. हे यावेळी विद्यार्थ्यांनी पटवून दिले.

केजी 1 च्या विद्यार्थ्यांनी हिरव्या भाजीपाल्यांची वेशभुषा साकारली होती त्यातून त्यांनी हिरव्या पाल्याभाज्यांचे महत्त्व पटून सांगितले तर नर्सरी च्या विद्यार्थ्यांनी हिरव्या फळांची वेशभूषा साकारली व त्यातून त्यांनी फळांचे महत्व पटवून दिले. यावेळी चिमुकल्यांनी वृक्षांचे, हिरव्या फळभाज्या व फळांचे महत्व एका नाटकातून पटून दिले.

या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्य शुभांगी अर्डक, ज्योती वंजारी, उज्वला राऊत, बबिता दामोधर, प्रियका नारींगे, स्वाती नागमोते, शीतल हिवरकर, ज्योत्स्ना सोनकुसळे व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे संचालन ज्योती वंजारी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments