Homeकृषीअतिवृष्टीने बाधीत शेतपिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश...

अतिवृष्टीने बाधीत शेतपिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश…

संजय आठवले, आकोट

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीपिके व फळपिकांच्या नूकसानीचे संयुक्त पंचनामे त्वरेने शासनास पाठविण्याबाबत शासनाने आदेश जारी केले आहेत.

यंदा सुरुवातीला हूरळवून देवून नंतर शेतक-याना प्रतिक्षा करायला लावणा-या पावसाने वर्षावाची सुरुवात केल्यावर बराच ऊच्छाद मांडला. परिणामी असंख्य शेतकरी बाधित झाले. काही ठिकाणी तर ओला दुष्काळ घोषीत करण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली.

नद्या, नाले, धरणे, अन्य जलाशय तुडूंब भरले. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला. अनेक ठिकाणी शेतीपिके व फळपिकांना मोठा फटका बसुन शेतक-यांची हानी झाली. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे मुख्य सचिवानी आदेश जारी करुन शेतीपिके व फळपिकांच्या नूकसानीचे संयुक्त पंचानामे अहवाल तयार करण्यास संबंधित यंत्रणांना फर्मावले आहे.

हे अहवाल तातडीने मंत्रालय मुंबई येथे पाठवायचे असल्याने या कामास युद्धस्तरावर सुरुवात झाली आहे. येत्या आठवड्यात हे काम पूर्णत्वास जावून संयुक्त स्वाक्षरी प्रस्ताव प्रपत्र अ ब क ड Annexture-1 विद्यमान जिल्हाधिकारी याना सादर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments