Homeराज्यकोगनोळीत स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..!

कोगनोळीत स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..!

प.पू परमात्मराज महाराज, पांडूरंग काजवे महाराज यांचे दिव्य सानिध्य…

कोगनोळी ता.निपाणी येथील एस.टी स्टॅन्ड चौकामध्ये नव्याने बांधलेल्या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ भक्त मंडळातर्फे मंगळवार दि. ३० पासून १ सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र आडी येथील परमाब्धिकार प.पू. परमात्मराज महाराज व अध्यात्मातील थोर विभूती पांडूरंग काजवे महाराज यांच्या दिव्य सानिध्यामध्ये मंगळवार दि. ३० रोजी सकाळी ‌९ वाजता मूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

बुधवार दि. ३१ रोजी सकाळी ६ वाजता होमहवन व मंत्र पुष्पांजली तर गुरुवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments