Friday, April 26, 2024
Homeराज्यरामटेक | विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार धडकले बसस्थानकावर...

रामटेक | विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार धडकले बसस्थानकावर…

Share

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )

रामटेक आगाराच्या बसेसचा लेटलतिफी कारभार,बसेसची कमतरता,वाहकांची उद्दाम वाहतूक यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत यायला रोजच उशीर होतो. अगोदरच अभ्यासाचे बारा वाजले असतांना रोज बसेसच्या त्रासामुळे विद्यार्थी शाळा महाविद्यालयात उशिराने पोहोचतात. बस आगाराच्या या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थी रडकुंडीला आले आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी स्वत: आमदार आशिष जयस्वाल हे बसस्थानकात पोहोचले असता विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घालून बसेस संबंधी तक्रारी केल्या. जिल्हा बस नियंत्रक गजानन नागुलवार यांनी येत्या आठ दिवसात सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदारांना दिल्यानंतरच ते बसस्थानकावरुन परत आले. रामटेक हे मानव विकास मिशन अंतर्गत येत असल्याने येथे केंद्र शासनाने विशेष बसेस पुरविल्या आहेत हे येथे विशेष.

मागील दोन वर्ष कोरोनामुळे आणि त्यानंतरचे सहा महीने एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पुर्णपणे खेळखंडोबा झाला आहे. रामटेक हे तालुक्याचे ठिकाण असून येथे सर्व शाळा आणि महाविद्यालये आहे त्यामुळे रामटेकच्या पंचक्रोशीतून विद्यार्थी रामटेकला शिक्षण घ्यायला येतात. सर्व विद्यार्थ्यांना बस हा एकच आणि सोयिस्कर पर्याय आहे.

मौदा,तारसा,चाचेर,नेरला,आष्टी,नंदापूरी,नगरधन,चिचाळा,कोदामेंढी,अरोली,मसला,घोटीटोक,बोरी,शिरपूर,शिवनीभोंडकी,किरणापूर,भंडारबोडी,महादुला,लोहारा,बेलदा,हिवराबाजार,मुसेवाडी,नवेगाव,डोंगरी,देवलापार,पवनी,सराखा,बोर्डा,खुमारी,मनसर,माहुली,कन्हान,टेकाडी,आमडी,हिवराहिवरी,काचुरवाही,लोहडोंगरी,खोडगाव,किरणापूर,हातोडी,मसला,चोखाळा या गावांमधुन विद्यार्थी मोठ्या संख्येने रामटेकला येजा करतात. एकूणच विद्यार्थी संख्या लक्षात घेता बसेसची संख्या आणि त्याची वेळ विद्यार्थ्यांना येजा करण्यासाठी सोयीची होईल अशी असावी अशी अपेक्षा आहे. अलिकडे रामटेक आगाराच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत शाळांच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली,शाळांनी आगारांना पत्र दिले परंतु त्यावर काहीही करण्यात आले नाही.

राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनी बस स्थानकाला काही दिवसांपुर्वी घेराव देखील केला तरीही आगाराला जाग आली नाही. अखेर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना घेवून आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली. विद्यार्थ्यांच्या बसविषयक तक्रारी ऐकण्यासाठी आमदार स्वत: बसस्थानकात दाखल झाले असता विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घालून बसची समस्या मांडली. काहींनी वाहक शिबीगाळ करुन बसमधून उतरवून देतात, विद्यार्थी पाहून बस थांबवत नसल्याचे सांगीतले. पासेस काउंटरवर काम करणारे कर्मचारी देखील उद्धट सारखे बोलतात, शिवीगाळ करतात अशा तक्रारी विद्यार्थी करीत होते.

येत्या आठ दिवसात विद्यार्थ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याचा सज्जड दम आमदार जयस्वाल यांनी जिल्हा नियंत्रकांना दिला. यावेळी जिल्हा वाहतुक नियंत्रक गजानन नागुलवार,जिल्हा वाहतुक अधिकारी बोबडे,कटरे,आगार व्यवस्थापक भोगे,प्रणय ठाकरे,जि.प.सदस्य संजय झाडे,माजी सभापती बिकेंद्र महाजन,युवा सेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शरणागत,शिवसेना शहर प्रमुख धर्मेश भागलकर,माजी नगरसेवक राजेश किंमतकर,बंडु सांगोडे,गौरव पनवेलकर,अतुल काळे,विक्की बावनकुळे,खुशाल बरबटे,आशिष धोटे,किशोर ठाकरे उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: