Homeविविधप्रभातफेरी काढुन दिला "हर घर झेंडा" उपक्रमाचा संदेश…पोलिस व महसुल तथा नगर...

प्रभातफेरी काढुन दिला “हर घर झेंडा” उपक्रमाचा संदेश…पोलिस व महसुल तथा नगर परीषद प्रशासनाचा संयुक्त उपक्रम

विद्यार्थ्यांनी दिले ” भारत माता की जय ” चे नारे

राजु कापसे
रामटेक

आज दि. ८ ऑगस्ट ला स्थानीक पोलीस प्रशाषण, महसुल विभाग तथा नगर परीषद प्रशाषन यांचे संयुक्त विद्यमाने शहरात शालेय विद्यार्थी तथा एन.सी.सी. कॅडेट्स ला सोबत घेऊन प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय चा जयघोष केला.

सध्या सर्वीकडे शाशनाच्या निर्देशानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमीत्य हर घर झेंडा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान विविध विभागातील प्रशासकिय अधिकारी – कर्मचारी यांनी या उपक्रमात स्वतःला झोकुन देत उपक्रम यशश्वी करण्याचा माणस ठेवला असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

त्या अणुषंगाने आज दि. ८ ऑगस्ट ला शहरामध्ये स्थानिक पोलीस, महसुल तथा नगर परिषद प्रशाषणाने संयुक्तरित्या शालेय विद्यार्थ्यांना व एन.सी.सी. कॅडेट्स ला सोबत घेऊन शहरात प्रभातफेरी काढली. दरम्यान तहसिल कार्यालयापासुन प्रभातफेरी निघुन ती गांधी चौक मार्गे बसस्थानक मार्गाकडे गेली. प्रभातफेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी भारत माता की जय असा जयघोष केला.

यावेळी उपस्थितांमध्ये एस.डी.ओ. वंदना सवरंगपते, तहसिलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के, उपनिरीक्षक राऊत, श्रीकांत लांजेवार, नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचेसह विविध विभागातील अधिकारी – कर्मचारी, शालेय विद्यार्थी व एन.सी.सी. कॅडेट्स उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
राजू वसंतराव कापसे शितलवाडी परसोडा रामटेक जि, नागपूर हे महाव्हाईस न्यूज चे संस्थापक सदस्य असून ते गेल्या पाच वर्षापासून रामटेक प्रतिनिधी म्हणून काम सांभाळतात...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments