Homeराज्यरयतेचा कैवारी राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार सचिन ठोमरे सर यांना जाहीर...

रयतेचा कैवारी राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार सचिन ठोमरे सर यांना जाहीर…

दानापुर – गोपाल विरघट

शैक्षणिक क्षेत्रातील एकमेव डिजिटल दैनिक म्हणून महाराष्ट्र भर परिचित असणारे रयतेचा कैवारी द्वारे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.यावर्षी पनवेल येथे सदर पुरस्काराचे वितरण दिमाखदार सोहळ्यात दिनांक १८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

यावर्षीच्या या पुरस्कारासाठी जिल्हा परिषद कन्या शाळा दानापुर येथे कार्यरत असलेले इतिहासाचे अभ्यासक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे,संस्कार भारती संस्थेचे माध्यमातून नवोदित कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यात पुढाकार असणारे श्री सचिन तुळशीराम ठोमरे सर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

खेड्यापाड्यातून गोरगरीब विद्यार्थांसाठी सकारात्मक प्रयत्न करणाऱ्या ठोमरे सरांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन गावकरी,शिक्षक संघटना पदाधिकारी पत्रकार मंडळी यांनी सरांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments