Homeराजकीयप्रा.श्रीकांत देशपांडे यांना पुन्हा सभागृहात पाठवा...माजी आमदार दत्तात्रय सावंत

प्रा.श्रीकांत देशपांडे यांना पुन्हा सभागृहात पाठवा…माजी आमदार दत्तात्रय सावंत

श्रीकांत देशपांडे यांच्या माध्यमातून अमरावती विभागात पाच शाखा देतो – अध्यक्ष चंद्रकांत पाटील

शिक्षक संघर्ष संघटना व शिक्षक महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्षांच्या शिक्षक आघाडीत प्रवेश

सेवानिवृत्त शिक्षकांचा शिक्षक आघाडी कडून निरोपिय सत्कार

प्रतिनीधी अमरावती :- सेकंडरी स्कुल एम्ल्याईज को- आप क्रेडीट सोसायटी मुंबई या बॅकेच्या अमरावती विभागामधे सुभारंभ व शिक्षक आघाडीचे तिसरे महाअधिवेशन आज सांस्कृतिक भवन अमरावती येथे दिड हजार कर्मचारी यांच्या उपस्थित व पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषनामधे बोलत असतांना दत्तात्रय सावंत म्हणाले की शिक्षकांन साठी व शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित असलेल्या कामासाठी आपले लाडके माजी आमदार माझे सहकारी सभागृहात असने हे शिक्षकांन साठी व शिक्षणक्षेत्रा साठी अतिशय महत्त्वाचे आहे.

त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणुन सेकंडरी स्कुल एम्ल्याईज को- आप क्रेडीट सोसायटी मुंबई चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मी आपल्या अमरावती विभागातील पाचही जिल्हामधे आपले लाडके नेते प्रा श्रीकांत देशपांडे यांच्याच माध्यमातून शाखा देतो असे आश्वासन आपल्या भाषणातून दिले.

त्यानंतर संस्थापक अध्यक्ष प्रा.श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत संगिता शिंदे यांच्या शिक्षण संघर्ष संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजानन तुपकर व 30 सहकारी शिक्षक,मेहकर तालुकाध्यक्ष गणेश वोहर व 15 सहकारी शिक्षक, शेखर भोयर यांच्या शिक्षक महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष गोपाल सांगुनवेढे व सहकारी शिक्षक, शिक्षक महासंघाचे अकोला जिल्हा सविच सचिन वारकरी, विमाशीचे प्रदिप गावंडे व इतर अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांनी शिक्षक आघाडीमधे प्रवेश केला. नंतर अमरावती विभागातील 31 जुलै 2022 रोजी सेवानिवृत्त होत असलेले देविदास मेटांगे, सुनिल केने, स्मिता तिवारी,पद्मावती टिकार यांच्या अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत,प्रमुख अतिथी म्हणुन सेकंडरी स्कुल एम्ल्याईज को- आप क्रेडीट सोसायटी मुंबई चंद्रकांत पाटील,सचिव किशोर पाटील, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,सहसचिव सतिश माने, खजिनदार सतेज शिंदे, संचालक प्रमोद देशमुख,महाराष्ट्र राज्यशाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष मारुती गायकवाड, माजी अध्यक्ष सैय्यद राजिक, विभागीय सरचिटणीस विलास राऊत, विभागीय प्रसिद्धी प्रमुख रविंद्र सोळंके, बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजानन उबरहांडे, बुलढाणा यवतमाळ जिल्हाध्यक्ष रत्नाकर सिंगन,वाशिम जिल्हाध्यक्ष रमेश आरु, अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, कार्याध्यक्ष किशोर बनारसे,निलेश पारडे, जिल्हा सचिव पांडूरंग साखरकर,महादेव निर्मळ,विलास बुरघाटे,सुनिल बेहरे, निता गहरवाल,सतिश ताजने, शाम पंचभाई, साहेबराव मोहोड, अब्दुल सादिक व विभागीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी, महिला पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेत्तर हजारो कर्मचारी मोठा प्रमाणात उपस्थित होते अशी माहिती शिक्षक आघाडीचे विभागीय प्रसिद्धी प्रमुख रविंद्र सोळंके यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

देशपांडे माजी आमदार आहेत की आमदार हे कळायला मार्गच नाही- शिक्षक मधुकर इंगोले

प्रा.श्रीकांत देशपांडे यांच्यावर प्रेम करणारे आज सांस्कृतिक भवन अमरावती येथे शिक्षक आघाडी अधिवेशन शिक्षकांन साठी पतपेढी या निमित्ताने हजार च्या वर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.हाॅल व मैदानावरील गाड्यांची संख्या पाहता असे वाटते की प्रा.श्रीकांत देशपांडे हे माजी आमदार नसून आमदार आहे अशी प्रतिक्रिया एक शिक्षक मधुकर इंगोले पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments