Saturday, April 27, 2024
Homeक्रिकेटरोहित शर्मावर के श्रीकांत भडकले...कारण जाणून घ्या...

रोहित शर्मावर के श्रीकांत भडकले…कारण जाणून घ्या…

Share

न्युज डेस्क – टीम इंडियाचा माजी क्रिकेटर तथा धडाकेबाज फलंदाज कृष्णमाचारी श्रीकांतने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर जोरदार टीका केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने रोहितसोबत डावाची सुरुवात केली आहे.

पहिल्या सामन्यात सूर्याने 16 चेंडूत 24 धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात तो 6 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. सूर्या हा आघाडीचा फलंदाज असला आणि तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळत असला, तरी केएल राहुलच्या अनुपस्थितीत तो डावाची सुरुवात करत आहे. अशाप्रकारे सूर्यकुमार यादवचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो, असा विश्वास श्रीकांतला वाटतो.

फॅन कोडवर दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी श्रीकांत म्हणाले, ‘सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषक 2022 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा सर्वोत्तम खेळाडू आहे. मग त्याने डावाची सुरुवात करावी असे तुम्हाला का वाटते? जर तुम्हाला एखाद्या फलंदाजाने डावाची सुरुवात करायची असेल तर श्रेयस अय्यरला डावलून इशान किशनला संघात स्थान द्या. सूर्यकुमारसारख्या खेळाडूला वाया घालवू नका. दोन वाईट खेळीनंतर सूर्यकुमार यादवने आत्मविश्वास गमावल्यावर काय होईल?’

श्रीकांतपूर्वी मोहम्मद कैफनेही सूर्यकुमारने डावाची सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. भारताने ऋषभ पंतसह इंग्लंडमध्ये डावाची सुरुवात केली, तर इशान किशन डगआउटमध्ये बसला आहे. त्याचवेळी संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला याबाबत प्रश्न विचारला असता त्यानेही सडेतोड उत्तर दिले. भुवी म्हणाला होता की हे का केले गेले हे मला माहित नाही, परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या मागे काही प्लान असावा.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: