Homeगुन्हेगारीगर्दीचा फायदा घेत पेन्शनचे ४७ हजार पाचशे रुपये केले लंपास...सांगली शहर पोलिसात...

गर्दीचा फायदा घेत पेन्शनचे ४७ हजार पाचशे रुपये केले लंपास…सांगली शहर पोलिसात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल…

सांगली प्रतिनिधी-ज्योती मोरे

सांगली – आपल्या खात्यावरील पेन्शन काढण्यासाठी एसबीआय शाखा गणपती पेठ सांगली येथे गेलेल्या रघुनाथ तुकाराम पाटील वय 76 राहणार सातभाई गल्ली भाऊकेदारी वाडा कवलापूर, तालुका मिरज. यांची पेन्शन ची 47 हजार पाचशे रुपयांची रक्कम त्यांनी आपल्या जवळील पर्समध्ये ठेवून ती पर्स पिशवी ठेवली होती परंतु गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोराने सदर पिशवी कापून त्यातील पैसे असलेली पर्स हातोहात लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत रघुनाथ पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अधिक तपास शहर पोलीस ठाणे करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments