HomeMarathi News Todayऑटोरिक्षा चालकाने चक्क पादचारी पुलावर चढविली रिक्षा…व्हायरल VIDEO पाहून थक्क व्हाल…

ऑटोरिक्षा चालकाने चक्क पादचारी पुलावर चढविली रिक्षा…व्हायरल VIDEO पाहून थक्क व्हाल…

न्यूज डेस्क – पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा यासाठी व्यस्थ महामार्गावर पादचारी पुलाचे निर्माण केल्या जाते, रस्त्यावर फूट ओव्हरब्रिज झाल्यानंतर नागरिकांची रस्त्यावरील सुसाट वाहनांमधून रस्ता ओलांडण्याची गरज भासणार नाही. हे सहसा व्यस्त रस्त्यांवर बांधले जाते. त्यामुळे पादचाऱ्यांना सहज एका कड्यावरून दुसर्या कडेला जाण्याची सुविधा मिळते. मात्र महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

जेथे, व्यस्त मुंबई-अहमदाबाद महामार्गावर यूटर्न घेण्यासाठी चक्क रिक्षा फूट ओव्हरब्रिजवर टाकली. फूट ओव्हरब्रिजवरून ऑटोरिक्षा जात असल्याचे पाहून तेथे उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या व्यक्तीचे कारनामे देखील पाहू शकता. रोड्स ऑफ मुंबई या ट्विटर हँडलवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस चालकाला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, व्हिडिओ पाहून असे दिसते की ही घटना महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये घडली असून चालकाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले, ‘अधिक माहितीसाठी आम्ही व्हिडिओचा अभ्यास करत आहोत. फूट ओव्हरब्रिजवर चालकाने रिक्षा चालवण्यासाठी रॅम्पचा वापर केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments