Homeराज्यसाहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंच्या १०२ जयंती निमित्त केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर "भारतरत्न" द्यावा:राष्ट्रवादी...

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंच्या १०२ जयंती निमित्त केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर “भारतरत्न” द्यावा:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब शेख यांची मागणी…

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना जैलाब शेख म्हणाले की भारत सरकारने लोकशाहीर, अण्णाभाऊ साठेना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार केंद्र सरकार तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन साहित्यरत्न अण्णाभाऊं साठेंच्या उचित गौरव करावा.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनी शोषितांचे, दलितांचे,दिनदुबड्यांचे,

पिडीतांचे कष्टकऱ्यांचे व कामगारांवार होणारे अन्याय अत्याचार विरुद्ध अण्णाभाऊ साठेनी आपल्या शाहीरीतून त्यांच्या व्यथा मांडल्या त्यांना न्याय मिळवून दिला. वंचीतांमध्ये जनजागृती निर्माण केली अशा थोर साहित्यरत्नला केंद्र सरकारने विना विलंब मरणोत्तर भारतरत्न जाहीर करावा.अनेक साहित्यिक आपल्या कवितामध्ये.डोंगर,झाड़े,फुले,समुद्र,नदी प्राणी व पक्षी यांच्यावर कविता लिहल्या.

पण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनी मनुष्यावर शाहीर,कविता,साहित्य निर्माण केले… जग.. बदल ..घालुनी.. घाव.. मज. सांगूनी.. गेले.. भिमराव… अशा आपल्या शाहिरीतून, काव्यातून जनजागृती करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एकमेव दलित,शोषित पीडित,

कामगारावर व माणसावर लिहिणारे व आपल्या शाहिरीतून त्यांच्या व्यथा मांडणारे भारत देशातील एकमेव असे साहित्यिक कवी,शाहीर होते म्हणून अशा थोर साहित्यिकाचा उचित गौरव व्हावा म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा शहर चिटणीस जैलाब शेखनी केली. यावेळही विजय बल्लारी,वाजिद खतीब,रोहन भंडारे,सात गवंडी, प्रमोद कांबळे,सुनील मोरे,सलीम मुलानी व शंकर कांबळेसह आदी बहुजन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments