Homeराज्यमहाराष्ट्र शाहीर परिषद व शाहिरी कला व लोककलावंत विकास परिषद यांच्या वतीने...

महाराष्ट्र शाहीर परिषद व शाहिरी कला व लोककलावंत विकास परिषद यांच्या वतीने क्रांतीशाहीर कै.ग.द.दीक्षित यांना 73 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

सांगली प्रतिनिधी– ज्योती मोरे

महाराष्ट्र शाहीर परिषद आणि शाहिरी कला व लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने आज क्रांतीशाहीर ग.द. दीक्षित यांच्या 73 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन करून शाहिरी मुजरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सांगलीतील गावभागात शाहीर ग.द. दीक्षित चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला पत्रकार तानाजी जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यानंतर शाहिरी नमन करून शाहिरांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष शाहीर अनंत कुमार साळुंखे, शाहीर अवधूत विभुते, शाहीर रामचंद्र जाधव, शाहीर मोहन यादव, महिला शाहीर विजया बुधगावकर, शाहीर जंगम, शाहीर मोरे, रमेश गायकवाड, आदी ज्येष्ठ शाहीरांसह नवोदित शाहिर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments