Homeराज्यमाजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून ऐतिहासिक सोहळा संपन्न...

माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून ऐतिहासिक सोहळा संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

आज राष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने सांगली जिल्यातील सर्वात उंच 75 फूट उंच भव्यदिव्य 14 बाय 21 फूट ध्वजाचे 75 व्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिनानिमित्त देशाची सेवा बजावणारे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला – प्रशांतभाऊ सदामते…

सांगली जिल्ह्यात प्रथमच राष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने आज सकाळी 9 वाजता 75 फूट उंचीच्या पोलवर 14 बाय 21 फूट तिरंगा ध्वजारोहण सोहळा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या आजी माजी सैनिकांच्या हस्ते संपन्न झाला,

यावेळी तिरंगा सन्मानाने मोठ्या दिमाखात कार्यक्रमस्थळी सैनिकांच्या हस्ते आणला गेला,फाटकांची आतिषबाजी करण्यात आली,जोरदार घोषणाबाजी झाली,अनेक मान्यवर व देशप्रेमींनी या ऐतिहासिक स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहून तिरंगा ध्वजास फडकवून सलामी दिली व राष्ट्र गीताने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.

75 व्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सोहळ्यात उपस्थित राहून या अनेकजण ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले,हा सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक तिरंगा ध्वज तीन दिवस दि. 13 ऑगस्ट रोजीपासून 14 व 15 ऑगस्ट सायंकाळ पर्यंत फडकत राहणार आहे,

स्वातंत्र्याचा 75 अमृतमहोत्सव कार्यक्रम हा अंबाबाई तालीम संस्था बेथलमनगर मैदानात आयोजित केला असून, जिल्ह्यातील देशप्रेमी मोठ्या संख्येने हा तिरंगा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत,यावेळी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक,महिला,पुरुष व तरुणांच्या बरोबर राष्ट्र विकास सेना पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments