Homeराज्यकाचुरवाही येथे प्रभातफेरी काढुन दिला हर घर तिरंगा उपक्रमाचा संदेश...

काचुरवाही येथे प्रभातफेरी काढुन दिला हर घर तिरंगा उपक्रमाचा संदेश…

रामटेक – राजु कापसे

आज दि.१२ आगस्ट रोज शुक्रवारला, स्व ऍड नंदकिशोर जयस्वाल माध्यमिक विध्यालय व कला कनिष्ठ महाविध्यालय, काचुरवाही येथे,स्वातंत्र्याचा ” ७५”व्या अमृत महोत्सवा निमीत्य काचुरवाही गावात शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी “भारत माता की जय, वंदे मातरम अशाप्रकारे जयघोष संपूर्ण गावामध्ये देण्यात आले.

दरम्यान समस्त जनतेने आपापल्या घरावर ध्वजसहितेचे पालन करून,”हर घर तिरंगा” लावण्यात यावा यासाठी जनतेला बाजार चौकातील सभागृहात मार्गदर्शन करण्यात आले. या प्रभातफेरी मध्ये शाळेतील विध्यार्थ्यांनी स्वातंत्र्यकरिता लढणारे नेते व हिरो यांच्या वेशभूषा केलेल्या होत्या.

मानव नाटकर(बाबासाहेब आंबेडकर)रोशन पटले(सुभाषचंद्र बोस)प्रियनशू हूड(संत गाडगेबाबा)विनू सहारे(महात्मा जोतिबा फुले)चिराग साकोरे(पंडित ज,नेहरू)आयुष गराडे(शाहिद भगत सिंग)भावेश गायकवाड(महात्मा गांधी)आरुषी झिलपे(किरण बेदी)प्रतीक्षा दुधपचारे (राणी लक्ष्मीबाई,झासी) वंशिका मोहनकार (अहिल्याबाई होळकर) रानु बागडे(सावित्रीबाई फुले)अदिती साकोरे(इंदिरा गांधी)सोनिया सोमनाथे(जिजामाता)कशीष धुर्वे(जिजामाता)गुंजन धुर्वे(सावित्रीबाई फुले)हर्षल नैताम(झाशीची राणी)त्रिवेदी बावनकुळे(जिजाई)

पूर्वी कुंभलकर (लक्ष्मीबाई) तर परिणीता सोमनाथे(सावित्रीबाई) या सर्वच चिमुकल्यानी अतिसुंदर वेशभूषा केलेली होती. सर्व गावकर्यांना जुना इतिहास आठवला की अशाप्रकारे आपल्याही देशात हिरो व हिरोंईन होत्या,त्यांनी देशासाठी काय मोलाचे कार्य केलेत याची सर्वाना आठवण आली. लोकांच्या मनात राष्ट्रजागृती, राष्ट्रप्रेम जागे झाल्यागत वाटत होते. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

यानंतर रॅली शाळेत प्रस्थान करताच व शाळेच्या सभागृहाध्ये “रक्षाबंधन”कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रामटेक पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक सिमा बेंद्रे यांनी विध्यार्थ्यांना बॅड टच आणि गुड टच बद्दल विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी मोबाईल फोन चा वापर करू नये, आवश्यक कामाकरिता वापर करावा, १८ वर्षाखालील विदयार्थ्यांनी टू-व्हीलर चालवू नये, ज्याच्याकडे परवाना असेल त्यांनीच गाडी चालवावी,

किव्हा विध्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल त्यांनी पोलीस दादा, पोलीस दीदी किव्हा माझी मदत घ्यावी मला फोन करावं असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर,काचुरवाही बिट,पो,हवा,सुरेश धुर्वे,शिपाई गोरखनाथ निंबारते सह महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील कोल्हे यांनीसुद्धा विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील कोल्हे,जगदीश बसिने,संजय बोन्द्रे, माया मुसळे,देवराव धुर्वे,वनिता मोहनकार,अंजली गुप्ता,प्रा,अंजली चकोले,विक्रम गजभिये,फारुख शेख,शेख नवाब शेख नबी,मुरलीधर मोहनकार,पंढरी कडू,सुप्रिया गजभिये, शुभम कामळे, संजय धुर्वे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments