Homeराज्यजनतेनी अफवावर विश्वास ठेऊ नये; खात्री केल्याशिवाय कोणतेही मॅसेज सोशल मीडियावर टाकू...

जनतेनी अफवावर विश्वास ठेऊ नये; खात्री केल्याशिवाय कोणतेही मॅसेज सोशल मीडियावर टाकू नये – नांदेड पोलीस दलाचे जनतेला आवाहन…

नांदेड – महेंद्र गायकवाड

सध्या राज्यासह नांदेड जिल्हयात सोशल मिडीया, तसेच जनतेडुन वेगवेगळया माध्यमातुन मुले पळविणारी, शरीराचे अवयव काढुन विकणारी टोळी आल्या बाबत अफवा पसरविण्यात येत असुन अशा अफावर विश्वास ठेवू नये असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे.

कांही अनुचीत प्रकार, संशयास्पद आढळल्यास जनतेनी पोलीसांशी संपर्क साधवा त्यांना तात्काळ मदत पुरविण्यात येईल. शहरामध्ये व ग्रामीण भागात अफवा पसरविण्यात येत आहेत कि, शाळेतील लहान मुले तसेच निराधार मुले यांना पकडुन नेऊन त्यांचे शिरीराचे अवयव काढून विक्री करीत असले बाबत, फेरीवाले, घरोघरी जाऊन माल विकणारे इसम यांच्या टोळया आल्या असल्या बाबतची अफवा पसरविण्यात येत आहे.

जनतेनी खात्री केल्याशिवाय कोणतेही मॅसेज सोशल मिडीयावर टाकुनये, अशा प्रकारे अफवा पसरवितांना आढळल्यास पोलीस विभागातर्फे कायदेशिर कारवाई करण्यात येईल. तसेच कांही अनुचीत प्रकार आढळल्यास तात्काळ मदत पुरविण्यात येईल. अशा अफवावर जनतेनी विश्वास ठेऊनये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे , अपर पोलीस अधिक्षक भोकर विजय कबाडे यांनी पोलीस विभागातर्फे जनतेला केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments