Saturday, April 27, 2024
Homeगुन्हेगारीतासगाव मधील हॉस्पिटल मधून अपहरण झालेलं बाळ तासगाव पोलिसांनी आठ तासाच्या आत...

तासगाव मधील हॉस्पिटल मधून अपहरण झालेलं बाळ तासगाव पोलिसांनी आठ तासाच्या आत शोधून दिले आईच्या ताब्यात…

Share

सांगली प्रतिनिधी –ज्योती मोरे

सांगली जिल्ह्यातील तासगाव मधील डॉक्टर अंजली पाटील यांच्या सरस्वती आनंद या हॉस्पिटलमधून आज सकाळी एका महिलेने आपण नर्स असल्याचे भासून एका नवजात बाळाला पळवून नेल्याची खळबर्जनक घटना घडली होती. या महिलेचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले होते. या अनुषंगाने तासगाव पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवल्याने सदर महिलेला किर्लोस्करवाडी येथून ताब्यात घेऊन तिच्या जवळील बाळालाही ताब्यात घेतले आहे.

स्वाती छबुराव माने, मुळगाव नाशिक सध्या राहणार किर्लोस्करवाडी असे या महिलेचे नाव असून, ती तासगाव मधून या बाळाला घेऊन एका स्विफ्ट गाडीतून विटा पर्यंत गेली व त्यानंतर तेथून रिक्षाने आपल्या घरी किर्लोस्करवाडी ला गेली होती पोलिसांनी हे सगळे धागेदोरे तपासून तिच्यापर्यंत पोहोचून तिला अटक करून, बाळाची तिच्या तावडीतून सुटका केली.अपहरण अपहरण करण्याचे नेमके कारण अजून तरी समजलेलं नसले तरी लवकरच ते कारण स्पष्ट होईल.

आठ गुन्हा दाखल झाल्यापासून आठ तासाच्या आत तो उघडकीस आणणाऱ्या तासगाव पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम, विशाखा झेंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, नामदेव तारडे, विठ्ठल शेळके, पोलीस नाईक सागर लवटे, अमोल चव्हाण, सोमनाथ गुंडे, विलास मोहिते, बजरंग थोरात, पोलीस कॉन्स्टेबल समीर आवळे, दत्तात्रय जाधव, विनोद सकटे, अशोक सूर्यवंशी, हनुमंत गवळी, प्रदीप पाटील, तसेच महिला पोलीस आश्लेषा पवार, निकिता कांबळे, यांच्यासह विटा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अमर सूर्यवंशी, सुरेश भोसले, शशिकांत माळी, राजेंद्र भिंगारदिवे, सागर निकम, रोहित पाटील, अक्षय जगदाळे, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडील पोलीस कॉन्स्टेबल संदीप गुरव, पोलीस नाईक सागर टिंगरे, अनिल कोळेकर, सायबर सेलकडील प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे आदींनी सहभाग घेऊन यशस्वीरित्या पार पाडली.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: