HomeFeaturedराज्यवृक्षारोपण उपक्रम आज २९ जुलै २०२२ रोजी संपन्न झाला...

वृक्षारोपण उपक्रम आज २९ जुलै २०२२ रोजी संपन्न झाला…

रामटेक – राजु कापसे

सामाजिक आणि पर्यावरणीयबाब स्वीकारण्याची जबाबदारी ही ईश्वराने बुध्दीमत्तेच्या कक्षात बघता मानव प्राण्यालाच दिलेली आहे. याचे दायित्व वहन करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण उपक्रम मा. औषधी निरीक्षक श्री मनीष चौधरी सर यांनी रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेला आवाहन केले होते.

त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. तहसीलदार बाळासाहेब मस्के , मा. नायब तहसीलदार गोषलकर साहेब, मा. नगरसेवक सुमित कोठारी, मा. संजय खोब्रागडे व मा. मनीष मेहाडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आज २९ जुलै २०२२ रोजी संपन्न झाला.

उपविभागीय अधिकारी यांच्या व्यस्तेतेमुळे कार्यक्रमाला येऊ शकल्या नाही मात्र फोन वरून त्यांनी शुभेच्छा संदेश दिला. झाडे सहा ते दहा फूट उंचीची आणि त्यास ट्री गार्ड लाऊन सुरक्षित करण्यात आली. कार्यक्रमास रामटेक क्षेत्रातील जवळपास तीस ते पस्तीस औषधी विक्रेता बंधू उपस्थित होते ज्यांनी वृक्षांचे पालकत्व स्वीकारण्याची हमी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments