Homeगुन्हेगारीलोहा तालुक्यातील माळाकोळी परिसरात वीज पडून दोघेजण ठार...

लोहा तालुक्यातील माळाकोळी परिसरात वीज पडून दोघेजण ठार…

नांदेड -महेंद्र गायकवाड 

लोहा तालुक्यातील माळाकोळी परिसरातील खेडकरवाडी शिवारात आज वीज पडून एक महिला व एक पुरुष दगावल्याची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात आहे.   

लोहा तालुक्यातील माळाकोळी परिसरातील मौजे नागदरवाडी येथील  संगाबाई तात्याराव केंद्रे यांच्यावर सोमवारी  दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान अचानक आलेल्या पावसात  त्यांच्यावर वीज पडुन त्यांचं निधन झाले. नागदरवाडी इथूनच काही अंतरावर असलेल्या रमणेवाडी येथील याच पावसामुळे पांडुरंग कंधारे यांच्यावर वीज पडून दुखद निधन झाल्याची घटना घडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments