Friday, April 26, 2024
Homeराज्यघरात झोपलेल्या दोन भावंडाचा सर्पदंशाने मृत्यू...मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील घटना...

घरात झोपलेल्या दोन भावंडाचा सर्पदंशाने मृत्यू…मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथील घटना…

Share

भंडारा – विपुल परिहार

घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली।या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली आहे.

सुशील बलवीर डोंगरे (8) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (11 ) असे मृत भावंडाचे नाव आहे।रात्री ते एकाच बिछान्यावर झोपी गेले होते।रात्री मागच्या दारातून साप आत आला,तो बिछान्यावर चढला असता त्या सापाने दोघाही भावानं दंश केला।काहीतरी चावल्याचा भास झाला। साप चावल्याचे माहित होताच दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते। त्यानंतर त्या दोनही भावांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.

भंडारा येथे उपचारादरम्यान थोरला भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे यांचा रात्रि मृत्यू झाला।तर भंडारा येथून धाकटा भाऊ सुशील बलवीर डोंगरे याला भंडारा येथून रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले,मात्र त्याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: