Saturday, April 27, 2024
Homeराज्य'उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य' ग्राहकाच्या सोयीनुसार महावितरणच्या सेवेत बदल - डॉ.आनंद घोंगडे...

‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ ग्राहकाच्या सोयीनुसार महावितरणच्या सेवेत बदल – डॉ.आनंद घोंगडे…

Share

नुक्कड नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून उल्लेखनिय कामगीरीचा गौरव

ऊर्जा क्षेत्रात मागील आठ वर्षात झालेल्या भरीव कामगीरीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात सुरळीत वीज पुरवठ्यात महावितरणला यश आल्याचे प्रतिपादन अध्यक्ष विदर्भ ग्राहक संघटना डॉ.आनंद घोंगडे यांनी केले. अमरावतीनंतर मोर्शी परशूराम भवन येथे जिल्हा प्रशासन, महावितरण,महापारेषण आणि महानिर्मितीच्या वतीने बुधवारी दिनांक २७ जुलै रोजी आयोजित ‘उज्ज्वल भारत उज्ज्व भविष्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संजय गुलक्षे, डॉ. प्रदिप कुऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले ,गट विकास अधिकारी उज्ज्वला ढोले,मुख्य अभियंता जयंत विके,अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे,दिपक देवहाते, उप व्यवस्थापक (PFC) दीपक जैन,कार्यकारी अभियंता राजेंद्र मळसणे आदी उपस्थित होते. महावितरण ही सेवा देणारी कंपनी आहे.त्यामुळे बदलत्या काळानुरूप महावितरणच्या ग्राहकाभिमूक केलेल्या सेवा ह्या कौतूकास्पद असल्याचे मत डॉ. घोंगडे यांनी यावेळी व्यक्त केले.

खासदार डॉ.अनिल बोंडे यांचा व्हिडीवो संदेश
यावेळी व्हिडीवो संदेशाव्दारे बोलतांना खासदार डॉ.बोंडे म्हणाले की,उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घराला वीज आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला वीज मिळावी यासाठी केलेल्या प्रयत्नाचा हा उत्सव आहे.

शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी हा शासनाचा मानस असून २०४७ पर्यंत शेतकऱ्याला दिवसाला वीज मिळेल याचा विचार करण्यात आल्याचे यावेळी ते बोलले.तसेच मागील काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी यासाठी सुरूवात केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून गव्हाणकुंड येथे १६ मेगावॉटचे आणि लेहगाव येथे १ मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारण्यात आले आहे.

यासोबतच शासनाच्या विविध योजनेतून मागील आठ वर्षात जिल्ह्यात पायाभूत विकासाची भरीव कामे करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. उज्जव भारत उज्ज्वल विकास कार्यक्रमादरम्यान वीज क्षेत्राची यशोगाथा असलेल्या ७ चित्रफिती दाखविण्यात आल्या.तसेच नुक्कड नाटक,आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा विकासाचा वेध घेण्यात आला. तसेच यावेळी मागील आठ वर्षात विविध योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जनसंपर्क अधिकारी
महावितरण,अमरावती परिमंडळ


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: