Homeगुन्हेगारीवाशीम | ग्रामसेवकाला पाच हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले...वाशीम ACB ची कारवाई...

वाशीम | ग्रामसेवकाला पाच हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले…वाशीम ACB ची कारवाई…

वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मांडावा येथील ग्रामसेवकास 5 हजाराची लाच घेतांना वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले असून त्याच्याकडून लाच घेतलेली रक्कम जप्त करून पोलीस कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. श्री.प्रेमानंद शामराव मनवर वय 45 वर्ष रा.शहापूर ता.मंगरुळपीर, जि.वाशिम असे ग्रामसेवकाचे नाव असून पंचायत समिती रिसोड जि.वाशिम मार्फत मांडवा येथे ग्रामसेवक पदावर रुजू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडीलांच्या नावे असलेले घराची नोंद तक्रारदार यांचे नावे करण्याकरीता यातील आलोसे ग्रामसेवक यांनी पडताळणी कारवाई दरम्यान 6,000/- रू. लाचेची मागणी करून पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे कडून 1000/-₹ स्विकारुन ऊर्वरित राहीलेले 5000/-₹ स्विकारण्याची तयारी दर्शविली. सापळा कार्यवाही दरम्यान राहीलेले 5,000/- रु.लाच रक्कम आलोसे मनवर ग्रामसेवक यांनी रिसोड येथे स्विकारली. आलोसे यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून लाच रक्कम जप्त करण्यात आली असून आलोसे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कारवाई १) मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधीक्षक, २) मा.श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, 3) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. यांच्या मार्गदर्शनात झाली आहे.

या कारवाईसाठी सापळा व तपास अधिकारी श्री.गजानन आर शेळके पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. वाशिम. पोलीस अंमलदार – पोहवा/नितिन टवलारकर, विनोद अवगळे,विनोद मारकंडे,दुर्गादास जाधव पोना/रविद्र घरत, योगेश खोटे चानापोशि मिलिंद चन्नकेशला…

सर्व नागरीकांना आवाहन कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, वाशिम पोलीस उप अधीक्षक
*@दुरध्वनी क्रं – 07252 235933
@टोल फ्रि क्रं 1064

  • मोबाईल क्र.*9423338424 *
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments