Homeराज्ययुवक राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मा.पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून...

युवक राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मा.पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा…

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री आ. जयंत पाटील साहेब यांच्या सुचनेनुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा संजयजी बजाज व युवक राष्ट्रवादी चे शहरजिल्हाध्यक्ष मा राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवक राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज स्टेशन चौक सांगली येथे मा पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी केक कापून नागरिकांना गाजर वाटप करण्यात आले. दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन करोडो युवकांच्या आयुष्याशी केंद्रातील भाजप सरकार खेळत आहे.यामध्ये भर म्हणून महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला पळवला.मोदी सरकारमुळे जीवनावश्यक वस्तू, खाण्याचे पदार्थ, पेट्रोल डिझेल ,गॅस यासह शेकडो वस्तूंच्या झालेल्या भरमसाठ दरवाढीने सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी माता भगिनींचे दैनंदिन जगणे असह्य बनले आहे.

आपल्याच धुंदीत वावरणार्‍या उद्योगपती धार्जीण्या भाजपाच्या मोदी सरकारने या प्रचंड महागाईला पुरकच पावले टाकली आहेत. अनेक शासकीय संस्था मोडीत काढणाऱ्या या सरकारने लाखो रोजगार संपुष्टात आणले आहे . हजारो कोटींची उदयोगपतींची कर्जे माफ करणाऱ्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांकडे मात्र डोळेझाकच केली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने आज बेरोजगार दिनाचा केक कापुन व तरुणांना गाजर वाटप करून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विनायक हेगडे , गॅब्रियल तिवडे , सुमुख पाटील , डॉ शुभम जाधव , अक्षय अलकुंटे , अजित दुधाळ , महालिंग हेगडे , नितीन माने , आकाराम कोळेकर , अक्षय शेळके , अफजल मुजावर ,

राहुल यमगर ,आदित्य नाईक ,सागर , माने , राहुल हिरोडगी , अमित पाटील , सचिन सगरे , अमीन शेख , अक्षय शेंडगे , राजू कांबळे , अमित चव्हाण , आदर्श कांबळे ,रोहन भंडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments